इन्सुलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १३ लाख ९२ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त.

इन्सुलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १३ लाख ९२ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त.

सावंतवाडी.

    तालुक्यातील इन्सुली येथील गोव्याहुन मुंबईच्या दिशेने जाणा-या संशयीत वाहनाची अधिकारी तपासणी करीत असताना  वाहन क्र  MH-07-AJ-2880 हे वाहन तपासणी दरम्यान न थांबल्याने त्याचा पाठलाग करण्यात आला.राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर खामदेव नाका येथे सदरचे वाहन थांबवुन त्याची तपासणी केली असता तपासणी मध्ये कागदी पुठ्याच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा दिसुन आल्याने सदरचे वाहन तपासणी नाका इन्सुली कार्यालयासमोर आणुन त्याची कसून तपासणी करण्यात आली.वाहनाच्या मागील हौद्याच्या वरील बाजुस असलेल्या चोरकण्यामध्ये लपवुन ठेवलेले गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डच्या एकुण २१०० सिलबंद बाटल्या मद्यसाठा  बेकायदेशीररित्या वाहतुक करीत असताना मिळुन आल्या. सदर प्रकरणी वाहन चालक विजय रमाकांत माने रा. शिरसोसवाडी नेरूर, कुडाळ याला मुद्देमालासह ताब्यात घेवून महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
     सदर गुन्ह्यामध्ये अं. रु.६,४२,०००/- किंमतीचे मद्य व रु.७,५०,०००/- किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण रु.१३,९२,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संजय मोहिते, तपासणी नाका इन्सुली  तानाजी पाटील व प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, स. दु. नि. दिपक वायदंडे, जवान  रणजीत शिंदे, यांनी केली. सदर प्रकरणी पुढील अधिक तपास दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली प्रदीप रास्कर हे करीत आहेत.