आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मालवण बसस्थानक नूतन इमारतीचे लोकार्पण

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मालवण बसस्थानक नूतन इमारतीचे लोकार्पण

 

मालवण
 

   पर्यटन नगरी मालवण शहराला साजेसे असे बसस्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात आले आहे. प्रवासी व पर्यटक यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या दृष्टीने अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या बरोबरच अधिक सेवा सुविधांच्या दृष्टीने ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्यासाठी आपण नेहमी एसटी प्रशासनासोबत आहोत. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मालवण बस स्थानक नूतन इमारत लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले.दरम्यान, बसस्थानक कामाचा राणे सातत्याने आढावा घेत होते तसेच प्रशासन आणि मंत्रालय स्तरावर त्यांनी पाठपुरावा सुरु ठेवला. दोन महिन्यांपूर्वी पुन्हा राणे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट दिली. प्रवासी वर्गाच्या सोईच्या दृष्टीने काही सूचना केल्या. त्यानुसार काम होऊन नवीन इमारत प्रवासी सेवेत दाखल झाली आहे. यावेळी जिल्हापरिषद प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, एसटीविभाग मुंबई प्रदेश स्थापत्य कार्यकारी अभियंत्या मीनल सोनवणे, प्रभारी विभाग नियंत्रक सुजित डोंगरे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, उपअभियंता पांडुरंग पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाख, विभागीय लेखाधिकारी सुवर्णा दळवी, मालवण आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, राजन वराडकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, माजी जिप सभापती संतोष साटविलकर, दादा नाईक, मंदार लुडबे, ललित चव्हाण, निशय पालेकर, भाऊ मोरजे, महिला पदाधिकारी सोनाली पाटकर, अंजना सामंत यासह अन्य महायुतीचे पदाधिकारी, एसटी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.