सहा वर्षांत खाद्यतेलाच टेन्शन मिटणार. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची अर्थसंकल्पात घोषणा
नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत बजेट सादर केला. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच हे पहिल पूर्ण बजेट होत. त्यामुळे देशातील जनतेबरोबरच सरकारमधील घटक पक्षांचही बजेटकडे लक्ष होत.या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.तसेच खाद्यतेलांच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सहा वर्षांच्या मिशनची घोषणा केली.भारत खाद्यतेलांच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. तेल आयात करावे लागते. यासाठी अब्जावधी रुपये खर्च करावे लागतात. यामागच सर्वात मोठ कारण म्हणजे भारतात तेलाच उत्पादन अतिशय कमी आहे.या गोष्टी विचारात घेऊन केंद्र सरकार यावर काम करत आहे.यात सुधारणा करून देशाला खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याच उद्दीष्ट सरकारने निश्चित केल आहे. यासाठी सरकार सहा वर्षांत एक खास मिशन सुरू करणार आहे. या मिशनची घोषणा अर्थमंत्री सितारामन यांनी केली.टॅक्स, पॉवर, अर्बन डेव्हलपमेंट, मायनिंग, फायनान्शिअल सेक्टर आणि रेग्युलेटरी पॉलिसी या सहा प्रमुख क्षेत्रात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असे अर्थमंत्री सितारामन यांनी सांगितले.भारतीय खेळणी उद्योगासाठी सपोर्ट स्किम.किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता पाच लाख रुपये, स्वस्त दरात शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत कर्ज देणार. कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना पाच वर्षांचे पॅकेज. कृषी योजनांचा देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार.