माघी गणेश जयंती निमित्त वेंगुर्ला येथे साकारले दोन फूट उंचीचे गणपतीचे वाळूशिल्प

माघी गणेश जयंती निमित्त वेंगुर्ला येथे साकारले दोन फूट उंचीचे गणपतीचे वाळूशिल्प

वेंगुर्ला 

    माघी गणेश जयंती निमित्त वेंगुर्ला येथील आरवली सोंन्सूरे येथे प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चीपकर या कलाकाराने सुंदर अस दोन फूट उंचीचे गणपतीचे वाळूशिल्प साकारले आ हे.हे वाळू शिल्प साकारण्यासाठी त्यांना दोन तास लागले असून गणपतीचे हे मनमोहक रूप सर्वांना आकर्षित करून घेत आहे.श्री. चीपकर नेहमी आपल्या कलेने वेगवेगळे वाळूशिल्प साकारत असतात. माघी गणेश जयंती निमित्त साकारलेले हे वाळूशिल्प लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.