उद्यापासून रंगणार मालवण येथे नौदल दिन.

उद्यापासून रंगणार मालवण येथे नौदल दिन.

मालवण.

   सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण येथे दिनांक ०४/१२/२०२३ रोजी राजकोट  येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे अनावरण तसेच भारतीय नौसेनेचा नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर मंत्री  तसेच इतर व्ही.वही.आय.पी. व्यक्ती उपस्थित रहाणार आहेत. नौदल दिन साठी दुपारी १.०० वाजेपर्यंत प्रवेश सुरु राहणार आहे. कार्यक्रमाचे प्रात्याक्षिके ४.०० वाजलेपासून सुरु होणार असून नागरिकांना कार्यक्रम बघण्याची व्यवस्था व्यासपीठाच्या दक्षिणेकडे तारकर्ली,देवबागकडे आणि उत्तरेकडे दांडी बीच कडे केली आहे. नागरिकांना वाहन पार्कींगकरीता दांडी बीच ते मोरयाचा धोंडा, काळेथर मैदान व ग्रामपंचायत तारकर्लीच्या बाजूला सोय करण्यात आलेली आहे. कार्यक्रम सर्वांना पाहता यावा यासाठी कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यासाठी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.तरी नागरिकांनी नौदल दिन कार्यक्रम व नौसेना विभागाचे प्रात्याक्षिके पहावे तसेच नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहताना मोठ्या बॅगा, मोठया पर्स, लहान मुले व वृध्द व्यक्ती सोबत आणू नये अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.