अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने धोंडेवाडी कराड येथील प्राथमिक शाळेतील १०२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
सातारा.
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ चे वतीने प्रत्येक वर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांना अधारातुन प्रकाशाकडे नेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आणि शिक्षणाशिवाय आपली परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी जनजागृती अभियान राबवून समाज जागृत करण्याचे काम सुरू आहे म्हणून डोंगर दर्या खोऱ्यातील जंगलातील गोरगरीब वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या वर्षी ३१ मे २०२४ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करणेचा उपक्रम कराड तालुक्यातील भोसलेवाडी ओड ओडोशी येथे.व माण तालुक्यातील पिंगळी दडसवाडा शेवरी.या गावातील. २२४ विद्यार्थ्यांना मदत केली आहे. दिनांक १३ जून रोजी धोडेवाडी जि परिषद शाळा मधील इयत्ता १ ते ४ मधील १०२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं आहे डिचोली कोयनानगर पुनर्वसन येथील प्राथमिक शाळा मधील १७ विद्यार्थ्यांना मदत केली आहे अशी एकूण संख्या २२४ अधिक ११९ अशी मिळून ३४३ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
याप्रसंगी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रकाश काकडे चेअरमन धोडेवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी रघुनाथ काकडे माजी सरपंच माणिकराव गंगावणे पोलिस पाटील प्रताप मोरे ग्राम पंचायत सदस्य संदीप काकडे ग्राम पंचायत सदस्य सौ रुपाली काकडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती रवि काकडे अमोल काकडे दिनकर कदम तानाजी काकडे आप्पा राव काकडे जनार्दन शेरेकर माणिकराव भोसले कुबीर भोसले जयदीप गडाळे हर्षवर्धन काकडे सौ रुपाली ग काकडे मनिषा पाटील राणी पाटील दिपाली पवार रंजना सरगर मनिषा काकडे उज्वला गडाळे रेणुका शेडगे अर्चना गलांडे विजया काकडे प्राजक्ता पाटील इत्यादी उपस्थित होते याप्रसंगी मा तुकाराम काकडे संचालक रयत सहकारी साखर कारखाना व हाँटेल धनगर वाडा चे मालक रवी काकडे यांची भाषणे झाली.
यावेळी डिचोली कोयनानगर धोडेवाडी पुनर्वसन येथील गावातील १७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले होते त्यावेळी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शालिनी पाटील सामाजिक कार्यकर्ते बाबुराव बावधाने, जयराम कोळेकर जगन्नाथ कोळेकर, धाकलु कोळेकर, बाळु कोळेकर, रेश्मा बावधाने, जयवती बावधाने, ओंकार कोळेकर, भागोजी कोळेकर, सौ रुपाली काकडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, तुकाराम काकडे संचालक रयत सहकारी साखर कारखाना, प्रकाश काकडे चेअरमन धोडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी, मनोज काकडे, जयदीप गडाळे, हर्षवर्धन काकडे, माणिकराव गंगावणे, आप्पासाहेब काकडे इत्यादी उपस्थित होते व विद्यार्थी प्रताप मोरे ग्राम पंचायत सदस्य संदीप काकडे ग्राम पंचायत सदस्य अशोक काकडे चेअरमन धोंडे वाडी गणेश पतसंस्था व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शोभा गरुड यांनी केले तर आभार भालचंद्र थोरात यांनी मानले.