वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत २५ मे रोजी 'स्वच्छ वेंगुर्ला दौड' चे आयोजन

वेंगुर्ला
महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक असा लौकिक असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्थापनेस २५ मे २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहेत. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणा-या वेंगुर्ला नगरपरिषदेने वर्षानुवर्षे शहराच्या विकासासोबत स्वच्छतेतून समृध्दीकडे सातत्याने वाटचाल केलेली आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दिनांक २५ मे २०२५ रोजी “स्वच्छ वेंगुर्ला दौड” आयोजित करण्यात आलेली आहे. या उपक्रमा अंतर्गत खालीलप्रमाणे स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
(१) १५ कि.मी. खुली मॅरेथॉन स्पर्धा (पुरुष + महिला)
(२) ५ कि.मी. खुली हौशी मॅरेथॉन (FUN RUN) (पुरुष + महिला )
- १५ कि.मी. खुली मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग पुढीलप्रमाणे राहील.
सुरुवात घोडेबाव गार्डन–अग्निशमन केंद्र–मल्टीपर्पज हॉल– तहसिल कार्यालय–फळ संशोधन केंद्र–रामघाट रोड–स्वच्छ भारत पर्यटन स्थळ–पावर–हाऊस मार्गेरामेश्वर मंदिर – पिराचा दर्गा – वेंगुर्ला बस स्थानक–मानसीश्वर उद्यान मार्गे नवाबाग–झुलता पुल–वेंगुर्ला बंदर–दाभोली नाका–वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय व मार्केट–हॉस्पिटल नाका-त्रिवेणी उद्यान –घोडेबाव उद्यान
सदरच्या १५ कि.मी. खुल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी (पुरुष + महिला) स्पर्धकांनी दिनांक २५ मे २०२५ रोजी सहभाग नोंदणीसाठी सकाळी ठीक ५.३० वाजता घोडेबाव गार्डन येथे उपस्थित रहावे. सदरची स्पर्धा सकाळी ठीक ६.०० वाजता सुरु होईल. सदरच्या स्पर्धेची नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने होणार आहे. सदरच्या नोंदणीसाठीची अंतिम तारीख दिनांक २० मे २०२५ राहील. या नोंदणीसाठी शुल्क रक्कम रु.३००/- राहील. तदनंतर २२ मे २०२५ पर्यंत ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करणा-या स्पर्धकांना ४००/- रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. २२ मे २०२५ नंतर कोणत्याही प्रकारे नोंदणी स्वीकारली जाणार नाही. सदरच्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणा-यांना टी-शर्ट तसेच स्पर्धा पूर्ण करणा-यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तसेच पहिल्या तीन विजेत्यांना ( 3 पुरुष आणि 3 महिला ) ट्राफीसह रोख रक्कम रु. ५,०००/-, ३,०००/- व २,०००/- या प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे.
- ५ कि.मी. खुली हौशी मॅरेथॉन (FUN RUN) स्पर्धेचा मार्ग पुढीलप्रमाणे राहील
सुरुवात घोडेबाव गार्डन - पावर हाऊस मार्गे – रामेश्वर मंदिर – पिराचा दर्गा – दाभोली नाका – वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय व मार्केट – हॉस्पिटल नाका - त्रिवेणी उद्यान – घोडेबाव उद्यान
सदरच्या ५ कि.मी. खुली हौशी मॅरेथॉनसाठी (FUN RUN) स्पर्धकांनी दिनांक २५ मे २०२५ रोजी सहभाग नोंदणीसाठी सकाळी ठीक ६.३० वाजता घोडेबाव गार्डन येथे उपस्थित रहावे. सदरची स्पर्धा सकाळी ठीक ७.०० वाजता सुरु होईल. सदरच्या स्पर्धेची नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने होणार आहे. सदरच्या नोंदणीसाठीची अंतिम तारीख दिनांक २० मे २०२५ राहील. या नोंदणीसाठी शुल्क रक्कम रु.५०/- राहील. तदनंतर २२ मे २०२५ पर्यंत ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करणा-या स्पर्धकांना १००/- रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. २२ मे २०२५ नंतर कोणत्याही प्रकारे नोंदणी स्वीकारली जाणार नाही.सदरच्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणा-यांना टोपी व प्रमाणापत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या बाबतीत अधिक माहितीसाठी नगरपरिषदेचे कर्मचारी गणेश कांबळे, (मो.नं. ९६६५८५६५३०) व स्वप्नील कोरगावकर (मो.नं. ८८८८४३००८९ ) यांच्याशी संपर्क साधावा. सदरच्या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची लिंक https://forms.gle/2oYXH2WQoFqL75Zp7 अशी राहील. दिनांक २२ मे २०२५ पर्यंत नोंदणी करणा-या स्पर्धकांनाच मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेता येईल. वरीलप्रमाणे नमूद केल्यानुसार स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहावे. नमूद केलेल्या वेळेत सहभाग नोंदणी न केल्यास स्पर्धेत भाग घेता येणार नाही. याची सर्वानी नोंद घ्यावी.जास्तीत जास्त स्वच्छता प्रेमी स्पर्धकांनी व नागरीकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी केले आहे.