पुणे येथील मराठी विश्व संमेलनात मालवणी बोली भाषेतील लेखांचे प्रदर्शन
पुणे
मालवणी बोली भाषेतील स्तंभ लेखक विजय पालकर यांच्या विविध वृत्तपत्रे आणि साप्ताहिकांमधून प्रसिद्ध झालेल्या मालवणी बोली भाषेतील सात हजारांहून जास्त कात्रण संग्रहाची मांडणी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज आवारात विश्व मराठी संमेलनात करण्यात आली. मालवणी बोली भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याची संधी विश्व मराठी संमेलनात मिळाली. हे खुप मोठ भाग्य आहे.असे विजय पालकर यांनी यावेळी सांगितले.

konkansamwad 
