'एबकस' स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल सार्थक भाटकरचा मदर तेरेसा स्कूलच्या वतीने सत्कार.

वेंगुर्ला.
मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथील ४ थी तील विद्यार्थी कु. सार्थक भाटकर याने नुकत्याच राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या 'प्रोएक्टीव्ह एबकस' स्पर्धेत अचूक गणिते सोडवून यश संपादन केले.या त्याच्या यशाबद्दल मदर तेरेसा स्कूलच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक फा.फेलिक्स लोबो, संस्थेचे व्यवस्थापक व वेंगुर्ला चर्चचे धर्मगुरु फा. फ्रान्सिस डिसोजा यांच्या उपस्थितीत त्याला शाल, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.