खर्डेकर महाविद्यालयाच्या खेळाडूला मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक !

खर्डेकर महाविद्यालयाच्या खेळाडूला मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक !

वेंगुर्ला

        ठाणे जिल्ह्यातील सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूर येथे आयोजित मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत वेंगुर्ला येथील चैं. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा खेळाडू पै.नित्यानंद सुदेश वेंगुर्लेकर (तृतीय वर्षे विज्ञान) यांनी ७९ किलो वजन गटात कांस्य पदक जिंकले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी व संस्था प्रतिनिधी श्री. सुरेन्द्र चव्हाण यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास क्रिडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक, जिमखाना चेअरमन प्रा. के.आर. कांबळे, तसेच प्राध्यापक डॉ. बी.एम. भैस्ट, एस.एस. पाटील, डॉ. डि. जे. शितोळे, प्रा. एस.एस. चमणकर उपस्थित होते.खेळाडूला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मान. प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे देसाई, तसेच पेटून कॉन्सिल नंचर श्री. दौलतराव देसाई यांनी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.