सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढत असून शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज : आ.वैभव नाईक. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आ. नाईक यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून वेधले शासनाचे लक्ष.

कणकवली.

  कोकणामध्ये गेले आठ दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून विविध ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल गावातील बंगेवाडी मधील पाच घरांना दरड कोसळल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. येथील लोक बेघर झाली आहेत. त्याचबरोबर नेरुर कांडरवाडी मध्ये देखील दरड कोसळून येथील लोक बेघर झाले आहेत. अशा प्रकारे संपूर्ण  सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मालवण तालुक्यातील व कुडाळ तालुक्यातील अनेक ठिकाणी दरड कोसळून भूस्खलनाचा प्रकार घडत आहेत. त्यामुळे तेथील लोकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
   शासनाने या दरड कोसळण्याच्या घटनांची योग्य ती दखल घेणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  या दरड कोसळणाऱ्या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून लोकांना मदतकार्य करणे गरजेचे असल्याचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाच्या निदर्शनास आणून दिले.