संदेश पारकर यांच्या आजूबाजूस असणारेच सासोली जमिनीचे दलाल; त्यांनाच सोबत घेवून मोर्चा काढण्याची भाषा करणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार. मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांचा आरोप.
सावंतवाडी.
शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांनी आज सासोली जमीन प्रश्नी आपण जमीनमालकांना सोबत घेवून दोडामार्ग तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. मोर्चा काढून जमीनमालकांना न्याय मिळत असेल तर ठीक आहे मात्र तत्पूर्वी त्यांनी आपल्या आजूबाजूस असलेल्या स्थानीक पदाधिकारी यांच्या कडून या जमीन प्रश्नांची माहिती करून घ्यावी कारण हि जमीन कुडाळ येथील एका बलाढ्य बिल्डरच्या घशात घालून त्या बदल्यात दर महिन्याला हप्ते जमा करण्याचे काम हेच पदाधिकारी करत होते त्या नंतर हि शेकडो एकर जमीन गोवा राज्यातील एका माणसाला चढावू दराने विकण्यात याच माणसांचा सहभाग होता.आपण या प्रश्नी तुमचं नेत्रुत्व करतो अशा भूलथापा मारून या पदाधिकाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेतली जेव्हा हा प्रकार उघड झाला तेव्हा सासोली वासियांनी त्यांना आपल्या जमीन बचाव आंदोलनातून दूर लोटले. त्याच स्थानीक पुढाऱ्यांना सोबत घेवून आता संदेश पारकर दोडामार्ग तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याची भाषा करत आहेत हा एक प्रकारे सासोली वासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहॆ. मनात काहीतरी कुटील हेतू ठेवून कोणीतरी मोर्चा काढण्याची घोषणा करत असेल तर त्यापासून सासोली वासियांनी वेळीच सावध व्हावे.
या पूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांसमोर सासोली जमीन प्रश्नी जी सनद या पूर्वीच्या तहसीलदार यांनी दिली होती ती तात्काळ रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व प्रांताधिकारि यांना दिले होते. आदेश देवून अनेक महिने झाले तरी देखील पालकमंत्री यांनी दिलेल्या आदेशाची महसूल यंत्रणेने अंमलबजावणी केलेली नाही. या बाबत मनसे तर्फे प्रांताधिकारी यांची भेट घेण्यात आली होती. नेहमीप्रमाणे या वेळी दुसऱ्यावर बोट दाखविण्याचा प्रकार घडला होता.दरम्यान सासोली गावातील ज्यांच्या जमीनीवर कंपनी तर्फे अतिक्रमण करण्यात आलेले आहॆ त्यांना सोबत घेवून लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यात येणार असल्याचे अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले आहॆ.