भाजपा कामगार मोर्चाची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर.

भाजपा कामगार मोर्चाची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर.

सिंधुदुर्ग.

   भाजपा कामगार मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक राणे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व कोकण विभाग अध्यक्ष लिलाधर भडकमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्षांची निवड जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात आली.
   यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदी सत्यम नारायण सावंत यांची निवड करण्यात आली. तसेच कणकवली ( ग्रामीण ) संयोजक म्हणून दिपक महादेव गुरव, देवगड संयोजक म्हणून प्रकाश विष्णु सावंत, पडेल संयोजक म्हणून संदिप सहदेव देवळेकर, वैभववाडी संयोजक म्हणून दिपक सदाशिव गजोबार, मालवण ( शहर ) संयोजक म्हणून नारायण पंढरीनाथ लुडबे, मालवण ( ग्रामीण ) संयोजक म्हणून विक्रांत रमेश नाईक, कुडाळ संयोजक म्हणून आनंद महादेव लाड, ओरस संयोजक म्हणून सुरेश गजानन तानीवडे, आंबोली संयोजक म्हणून महेश वासुदेव पावसकर, सावंतवाडी ( शहर ) संयोजक म्हणून विनोद सुखदेव सावंत, बांदा संयोजक म्हणून संजय भिवसेन सावंत, वेंगुर्ला संयोजक म्हणून प्रशांत अंकुश नवार, दोडामार्ग संयोजक म्हणून जयप्रकाश जयराम भावे यांची निवड जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात आली.
      यावेळी प्रास्ताविक करताना अध्यक्ष अशोक राणे यांनी कामगार मोर्चाचे भविष्यात, संघटित व असंघटित कामगारांचे प्रश्न , ई श्रमकार्ड, कामगार कार्ड कामगारसाठीच्या सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यांना त्यांचा लाभ देणे. तसेच कंत्राटी कामगारांचे प्रश्न विश्वकर्मा योजना याबाबत माहिती दिली.
   भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्ह्यातील प्रत्येक घटकापर्यंत कामगार मोर्चाने पोहोचून घरेलु कामगार,  असंघटित कामगार, कंत्राटी कामगार, महिला कामगार यांचे पर्यंत लाभ पोहचवण्यासाठी काम करावे.पक्षाकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
  यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, लोकसभा मतदारसंघ संयोजक उदय गजानन गोवळकर, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे नारायण सावंत, जिल्हा कार्यालय मंत्री समर्थ राणे उपस्थित होते.