२ व ३ मार्च रोजी वेंगुर्ला हरिचरणगिरी येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

वेंगुर्ला
वेंगुर्ला येथील हरिचरणगिरी येथे ग्रामस्थ व मित्रमंडळ यांच्यावतीने २ व ३ मार्चला धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दोन दिवस दशावतार नाट्य नाट्यप्रयोग सादर होणार आहे.हरिचरणगिरी अंतिम स्टॉप येथे होणाऱ्या वार्षिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात रविवार २ मार्चला सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती आणि तिर्थप्रसाद, सायंकाळी ग्रामस्थांची भजने, सायंकाळी ७ वाजता श्री जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस -दांडेली सावंतवाडी, संचालक शरद मोचेमाडकर यांचा पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तर सोमवार ३ मार्चला सायंकाळी ७ वाजता श्री दत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन हरिचरणगिरी ग्रामस्थ आणि मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.