मालवण पोईप येथील उ.बा.ठा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

मालवण
मालवण, पोईप येथील उ.बा.ठा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
हिंदुत्व, विकास आणि जनसेवा या तत्त्वांवर चालणाऱ्या शिवसेना पक्षात दाखल होत कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, संजय पडते, दादा साईल, आनंद शिरवलकर यांसह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला, त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनही मतदार संघात उत्साहात स्वागत झाले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.