जेष्ठ नागरिक सेवा संघ कणकवली यांची मासिक सभा संपन्न

कणकवली
जेष्ठ नागरिक सेवा संघ कणकवलीची मासिक सभा विरंगुळा केंद्र कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष भालचन्द्र मराठे, कणकवली तालुकाध्यक्ष मनोहर पलयेकर, सल्लागार सीताराम कुडतडकर, उपाध्यक्ष अर्जुन राणे व सचिव प्रमोद लिमये हे उपस्थित होते. या सभेनंतर शंकर नरहरी कुंटे यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिक संघातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला असून सर्वानी त्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमावेळी बोलतान कुंटे गुरुजी यांनी आदर्श जीवन शैली तसेच पैसा हे साध्य नाही साधन आहे, आंनदी व समाधानी जीवन जगावे, प्रत्येक गोष्टीत आनंद घ्यावा, सुख उपभोगताना त्यात आनंद शोधावा असे आपले विचार मांडले तदनंतर त्यांचा सन्मान जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मराठे यांनी सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन केले. यावेळी दादा कुडतडकर, अर्जुन राणे, श्रद्धा तांबे, मनोहर पालयेकर यांनीदेखील आपले विचार मांडले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रमोद लिमये यांनी केले यावेळी कुंटे गुरुजी यांनी जेष्ठ नागरिक सेवा संघ कणकवली साठी रु.5000 ची देणगी देखील दिली असून जेष्ठ नागरिक संघानी त्यांचे आभार मानले.