भाजपा सिंधुदुर्ग तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

भाजपा सिंधुदुर्ग तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन


     भारतीय जनता पार्टी आयोजित संविधान गौरव अभियाना अंतर्गत वेंगुर्ले शालेय गटासाठी 23 व 25 रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 
   गुरुवार दिनांक 23 रोजी शालेय गट इयत्ता सातवी ते दहावी यांसाठी वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दुपारी 2.30 वाजता वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ले येथे संपन्न होणार असुन या वक्तृत्व स्पर्धेचा  विषय माझा अभिमान माझे संविधान हा असेल. यासाठी सहा ते सात मिनिटे वेळेचा कालावधी राहील.
   तसेच शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन स्पर्धा दुपारी 2.30 वाजता साई मंगल कार्यालय सुंदर भाटले येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेसाठी माझ्या शाळेतील ध्वजारोहण सोहळा हा विषय असेल. जलरंग वापरणे अनिवार्य असेल तसेच आयोजकांकडून कागद पुरवण्यात येतील. या स्पर्धेसाठी शाळा शिफारस किंवा ओळखपत्र अत्यावश्यक असणार आहे .
   या स्पर्धांसाठी प्रथम क्रमांक 1001 रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक 701रूपये व सन्मान चिन्ह ,तृतीया क्रमांक 501 रुपये व सन्मान चिन्ह उत्तेजनार्थ प्रथम 251 रुपये व सन्मान चिन्ह तसेच उत्तेजनार्थ द्वितीय 251 रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येईल. सदर स्पर्धेचे सर्व अधिकार आयोजकांकडे राहतील तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी संपर्क प्रसन्न उर्फ बाळू देसाई 9422436677 व सई चेंदवनकर (भाजप कार्यालय वेंगुर्ले) 7719983063 यांच्याकडे करण्यात यावी.