विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने २५ ऑगस्ट रोजी मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन.

विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने २५ ऑगस्ट रोजी मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन.

वेंगुर्ला.

   विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवार दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी  सकाळी १०:० ते दुपारी २:०० यावेळेत  रवी शिरसाट यांचे घरी वेंगुर्ला मेन रोड, वेंगुर्ला या ठिकाणी मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
   यावेळी डॉ. निरव दिलीप रायचुरा DNB (नेत्रविज्ञान) FMRF (संकरा नेत्रालय, चेन्नई) ऑप्थॅल्मिक प्लास्टिक, ऑर्बिटल आणि लॅक्रिमल सर्जन, डॉ.दृष्टी निरव रायचुरा एमबीबीएस, डीओ (संकरा नेत्रालय, चेन्नई) डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी लेसरमध्ये फेलोशिप (अरविंद आय हॉस्पिटल, कोईम्बतूर) हे डॉक्टर सेवा देणार आहेत.
 वेंगुर्ला परिसरातील गरजू नेत्र रुग्णांसाठी मुंबईतील अनुभवी आणि तज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने विश्व हिंदू परिषदाच्या वर्धापन दिना निमित्त मोफत नेत्र चिकित्सा शिबिरात नेत्र चिकित्सा व ऑपरेशन मोफत करण्यात येतील.तरी गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी रवी शिरसाट, मो. 9423405502 या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.