राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका.

जळगाव. 

   राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. त्यांना तातडीने मुंबईत आणण्यात येणार आहे. खडसे यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आणले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती कळताच त्यांनी खडसे यांना मुंबईला आणण्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खडसे यांना दुपारच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दाखल घेतली. त्यांनी प्रशासनाला खडसे यांच्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. काही वेळातच खडसे यांना मुंबईत आणण्यात येईल आणि त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येतील.