घोणसरी सरपंच प्रसाद राणे यांच्या संकल्पनेतून दिव्यांग योजना माहिती कक्षाची स्थापना
कणकवली
जिल्हा समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या योजना गावातील सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचाव्यात तसेच त्या अर्जाचे नमुने त्यांना मिळावेत याकरिता घोणसरी सरपंच श्री प्रसाद राणे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत घोणसरी येथे "दिव्यांग योजना माहिती कक्षाची" स्थापना करण्यात आली. याद्वारे सर्व दिव्यांग बांधवांचा एक ऑनलाईन पोर्टल द्वारे नोंदणी करून ग्रुप तयार करण्यात आला सदर ग्रुप द्वारे योजनांचे सर्व फॉर्म व अत्यावश्यक लागणारी माहिती शासन निर्णय हे सर्व त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवता पोहोचवण्यात येत आहे. दिव्यांग बांधवांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने आता दिव्यांग बांधवांना योजनेचा लाभ घेणे सोयीस्कर झाले आहे. या बाबत सर्व स्तरातून सरपंच श्री. प्रसाद राणे यांचे अभिनंदन होत आहे.