आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० शाळांना डिजिटल साहित्याचे वितरण.

आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० शाळांना डिजिटल साहित्याचे वितरण.

सिंधुदुर्ग.

   भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार निरंजन वसंत डावखरे यांच्या निधीतून आज सिंधुदुर्ग मधील ४० माध्यमिक शाळांना संगणक संचासहित डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले.सिंधुदुर्गनगरी प्राथमिक शिक्षक पतसंस्था ओरोस येथे या साहित्याचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
   यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांनी शिक्षक व संस्थाचालक यांच्याशी बोलताना शाळेतील मुलांच्या स्वच्छतागृह तसेच आधुनिक शिक्षण याच्यावर या पुढे भर देण्यात येईल असे सांगितले. तसेच शाळेतील भौतिक गरजा लक्षात घेऊन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांचा आमदार निधी यापुढेही देण्यात येईल असे अभिवचन दिले.
   या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, देवगड मंडल अध्यक्ष संतोष किंजवडेकर, संस्था प्रतिनीधी संजय रावराणे तसेच अनिल कुमार पांडव व रोहन सावंत उपस्थित होते.
   यावेळी मालवण तालुक्यातील ८, सावंतवाडी तालुक्यातील ४, वेंगुर्ले तालुक्यातील १०, वैभववाडी तालुक्यातील ६, कणकवली तालुक्यातील ३, कुडाळ तालुक्यातील ४, देवगड तालुक्यातील ५ माध्यमिक शाळांना डिजिटल साहित्याचे वाटप करण्यात आले.
   यावेळी संस्थाचालक व मुख्याध्यापक प्रतिनिधींनी आम.निरंजन डावखरे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन देवगड मंडल अध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केले.