कणकवली नगरपंचायतीच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी विशेष योगदान देणाऱ्या पर्यावरण दूतांचा सत्कार.

कणकवली नगरपंचायतीच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी विशेष योगदान देणाऱ्या पर्यावरण दूतांचा सत्कार.

कणकवली.

    शहरात पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या पर्यावरण दूतांचा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या दूतांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देणयात आले. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनात योगदान देणाऱ्या शहरातील बचतगट महिला सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.
  जागतिक वसुंधरा दिनाच्या औचित्यावर कणकवली नगरपंचायत सभागृहात पर्यावरण दूतांचा सत्कार आणि मतदान जनजागृती उपक्रम झाला. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे, कनक सिंधु शहरस्तर संघ अध्यक्षा सुचिता पालव, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, किशोर धुमाळे, विनोद सावंत, ध्वजा उचले, कणकवली कॉलेजचे प्रा.सुरेश पाटील, प्रा.बाळकृष्ण गावडे आदी उपस्थित होते.
   श्री.कंकाळ म्हणाले की, बदलत्या वातावरणामध्ये पर्यावरणाचे संतुलन राखणे महत्वाचे आहे. त्यासाठी सातत्याने वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. यामुळे तापमानासोबतच प्रदूषणावरही नियंत्रण राखता येणे शक्य आहे. यावेळी पर्यावरण संवधर्नामध्ये योगदान दिल्याबद्दल कणकवली कॉलेज, विद्यामंदिर हायस्कूल, कनक सिंधू शहर स्तर संघ आदींच्या प्रतिनिधींचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मुख्याधिकारी श्री. कंकाळ यांनी सत्कार केला. तर वृक्षारोपणासह प्लास्टिक मुक्तीबाबत विविध उपक्रम राबविणाऱ्या माऊली वस्ती स्तर संघ, जिजाई वस्ती स्तर संघ, नवदुर्गा वस्ती स्तर संघ यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच शहरात स्वच्छतेचे अविरत काम करणारे स्वच्छता कर्मचारी अविनाश तांबे आणि लक्ष्मण तांबे, कचऱ्यावर प्रकिया करणारे स्वच्छता कर्मचारी समीर मोरे आणि प्रकाश राठोड यांचा स्वच्छता दूत म्हणूनही सन्मान करण्यात आला.प्रास्ताविक वर्षा कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल भोगले यांनी केले. आभार अमोल अघम यांनी मानले.