फोंडाघाट महाविद्यालयाचे आंतरमहाविद्यालयीन ज्युडो स्पर्धेत यश

कणकवली
मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि एस. एम. शेट्टी महाविद्यालय पवई यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. शेट्टी महाविद्यालयात संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन ज्युडो स्पर्धेत फोंडाघाट महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी कांस्य पदक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. पल्लवी बाळकृष्ण शिंदे, टी. वाय. बी.कॉम वर्गाच्या विद्यार्थिनीने ४८ किलो वजन गटात कास्यपदक मिळवले, तर कोमल चंद्रकांत जोईल, टी.वाय. बी.कॉमच्या दुसऱ्या विद्यार्थिनीने ५२ किलो वजन गटात कांस्यपदकावर आपले नाव कोरले. दोन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे महाविद्यालयात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. गुणवंत विद्यार्थिनींना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश सावंत, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार विठोबा तायशेटे आणि संचालक मंडळ तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि फोंडाघाट ग्रामस्थांनी या यशाबद्दल विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.