अर्शदीप सिंग ला टी-20 क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार

अर्शदीप सिंग ला टी-20 क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार


मुंबई 
        'आयसीसी'ने अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला मोठा बहुमान मिळाला आहे. 'आयसीसी'ने 2024 या वर्षभरात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला आहे. 2024 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज असणाऱ्या अर्शदीपचा टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. गेल्यावर्षी त्याने 18 टी-20 सामन्यांमध्ये 36 बळी टिपले आहेत. विश्वचषकातील 8 सामन्यांमधील 17 विकेट्सचा त्यात समावेश होता.