नेमबाजी प्रशिक्षक कांचन उपरकर यांची 'नॅशनल गेम्स' साठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड.

सावंतवाडी.
'37 वी नॅशनल गेम्स 2023' 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे आयोजित करण्यात आली आहे. या मध्ये एकूण 42 क्रीडा प्रकारां सोबत नेमबाजी या क्रीडा प्रकारातील स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत. यात देशातील दिग्गज खेळाडू सहभागी होतील.
सिंधुदुर्गचे सुपुत्र तसेच उपरकर शूटिंग अकॅडेमी चे प्रशिक्षक श्री. कांचन वसंत उपरकर यांची निवड तांत्रिक अधिकारी म्हणून या स्पर्धे साठी करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी गोवा राज्य नेमबाजी स्पर्धे मध्ये रेंज ऑफिसर म्हणून काम केले आहे.ते मागील 17 वर्ष उपरकर शूटिंग अकॅडमी ही नेमबाजी प्रशिक्षण संस्था यशस्वीरित्या चालवत आहेत.तसेच त्यांच्या बऱ्याच खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर पदक पटकविली आहेत.सावंतवाडी, वेंगुर्ला, बांदा येथील रेंज वर ते नेमबाजी चे प्रशिक्षण देतात.त्यांना 2011-12 चा जिल्हा क्रीडा प्रशिक्षक या शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री. विक्रम भांगले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले असे त्यांनी या वेळी सांगितले.