सिंधुदुर्गातील दोन नेमबाजांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड.
सावंतवाडी.
पश्चिम बंगाल, आसनसोल येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया जी.व्ही.मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये उपरकर शूटिंग अकॅडमीचे नेमबाज सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये सावंतवाडीचा कु. परशुराम तिलाजी जाधव याने 400 पैकी 355 गुण मिळविले तर कुडाळ येथील कु.स्वामी समर्थ संजय बगळे यांनी 400 पैकी 347 गुण मिळवत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपले स्थान पक्के केले. परशुराम हा सावंतवाडी येथील शुटींग रेंजवर तर स्वामी समर्थ हा वेंगुर्ला, कॅम्प येथील शूटिंग रेंजवर प्रशिक्षक श्री.कांचन उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.
यापूर्वीच कु.राजकुमारी बगळे, कु.आयुष पाटणकर कु.साहिश तळणकर,कु.श्रीया नाखरे, श्री.अतुल नाखरे यांची 10 मी. एअर पिस्तूल प्रकारात तर कु.खुशल सावंत, कु.ओमकार सावंत,कु.वैष्णवी भांगले कु.संजना बिडये, कु.यश पवार (गोवा )यांची निवड 10 मीटर एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे.66 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा ही एअर रायफल प्रकारात नोव्हेंबर मध्ये दिल्ली येथे घेण्यात येणार आहे तर याच दरम्यान दहा मीटर एयर पिस्तूल प्रकारातील स्पर्धा भोपाळ शूटिंग रेंज वर खेळण्यात येणार आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री. विक्रम भांगले,सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन तसेच उपरकर शूटिंग अकॅडमीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.