बांदा येथे श्रीरामनवमी उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा.

बांदा येथे श्रीरामनवमी उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा.

सावंतवाडी.
 
    बांदा येथे श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.बांद्यातील श्री विठ्ठल मंदिर, श्री बांदेश्वर मंदिर, श्री साईबाबा मठ, संत सोहिरोबानाथ आंबिये मठ तसेच श्रीराम पंचायतन मंदिर, पानवळ येथे हा सोहळा साजरा करण्यात आला.
   बांदा श्री विठ्ठल मंदिरात दुपारी ठिक 12 वाजता रामनामाच्या जयघोषात प्रभु श्रीरामाला पाळण्यात घालून झोके देण्यात आले. सर्व भाविकांनी पुष्पवृष्टी केली. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात पालखी फेरी निघाली. श्री बांदेश्वर मंदिरामध्येही याच वेळेत भाविकांच्या उपस्थितीत रामन्मसोहळा होऊन श्रींची सवाद्य पालखी फेरी निघाली. मार्गात दोन्ही पालख्यांच्या वार्षिक भेटीचा सोहळा झाला. गावातील देवतांना भेट देऊन दोन्ही पालख्या मंदिरात परतल्या. बांदा येथिल श्री साईमठ, संत सोहिरोबानाथ आंबिये मठ आदी ठिकाणी रामनवमी उत्सव साजरा झाला.