फार्मर-आयडीमुळे शेतकऱ्यांना एका क्लिकवर सर्व डेटा उपलब्ध होणार

वेंगुर्ला
कुशेवाडा गावात कृषी विभागामार्फत ऍग्रोस्टॅक प्रकल्प अंतर्गत फार्मर-आयडी तयार करणे प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाकरिता सरपंच निलेश सामंत, उपसरपंच महादेव सापळे, ग्रा.पं. सदस्य आदी गावातील पदाधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम, उपविभागीय तंत्र अधिकारी पाटील, तालुका कृषी अधिकारी वेंगुर्ला एम. व्ही. चव्हाण, कृषी पर्यवेक्षक एस. बी. देसाई गावचे कृषी सहाय्यक एस. एस. परब आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी फार्मर आयडीचे भविष्यातील उपयोग सांगताना या मागचा सरकारचा हेतूही शेतकऱ्यांना समजावून सांगितला.या योजनेतून शेतकऱ्याचा एका क्लिकवर सर्व डेटा उपलब्ध होणार आहे व त्यामुळे भविष्यात शासकीय योजना राबवताना उद्भवणाऱ्या अडचणींवर मार्ग काढणे सहज व सोपे होणार आहे. फार्मर आयडी काढण्याकरिता शेतकऱ्याला त्याच्या मालकीचे आठ अ नमुना, आधार कार्ड व आधार रजिस्टर मोबाईल नंबर इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. हे आय डी तयार करण्याचे काम आपल्या नजीकच्या ई सेवा केंद्रात चालू असल्यामुळे प्रत्येक जमीन धारक भविष्यात तो लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही असे यावेळी मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले.