अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ हजारांहून अधिक शेतकरी बाधित......४ हजार ३३८ हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान

अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ हजारांहून अधिक शेतकरी बाधित......४ हजार ३३८ हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान

 

सिंधुदुर्गनगरी

 

         माहे ऑक्टोबर २०२५ दरम्यान झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे भात, नाचणी तसेच इतर हंगामी शेतीपिकांची हानी झाली असून, बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे क्षेत्रीय पातळीवर सुरू आहेत.
     जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ३३८ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. या नुकसानीचा फटका ५२५ गावांतील तब्बल १७ हजार १७२ शेतकऱ्यांना बसला आहे.
       पंचनामे करण्याचे काम सहायक कृषि अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संयुक्त पथकांमार्फत सुरू असून, ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे त्यांनी आपल्या ग्रामस्तरीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन नाईकनवरे यांनी केले आहे.