विविध स्पर्धेत वेंगुर्ला येथील अणसूर पाल हायस्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

वेंगुर्ला
श्री सातेरी वाचनालय व गुरुमाऊली माई मांजरेकर ग्रंथ संग्रहालय वजराट, वेंगुर्ला यांच्यावतीने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत मोठ्या गटातून वेंगुर्ला येथील अणसूर पाल हायस्कूल अणसूर शाळेतील तन्वी हेमंत मेस्त्री प्रथम क्रमांक, सानिया सुधाकर गावडे द्वितीय क्रमांक, पुर्वा विनोद चव्हाण उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला असून अनुक्रमे रोख पारितोषिक रु.९००/-,रु.६००/- रु.२००/-, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन वजराट ग्रंथालय व वाचनालयाच्या मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले तसेच वेंगुर्ला आरोग्य अधिकारी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्श - कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत, तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत श्रीयश दिलीप मालवणकर द्वितीय क्रमांक व सानिया सुधाकर गावडे उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला असून यांना देखील रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व अणसुर पाल हायस्कूल शाळेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.