रेडी येथील शिबीरात ३४ रक्तदात्यांचे रक्तदान

रेडी येथील शिबीरात ३४ रक्तदात्यांचे रक्तदान

रेडी

 

    स्व. चंद्रकांत उर्फ निलेश राऊळ यांच्या स्मृती प्रित्यर्थ रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रितेश राऊळ मित्रमंडळाने सलग १३ व्या वर्षी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात एकूण ३४ रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.
      रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रितेश राऊळ मित्र मंडळाने स्व. चंद्रकांत उर्फ निलेश राऊळ यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उदघाटन भाजपचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब यांच्या हस्तें दिपप्रज्वलनाने झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत रेडी गावचे सरपंच रामसिंग राणे, जि.प चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रेडी उपसरंपच आनंद भिसे, आरवली सरपंच समीर कांबळी, आरवलीचे माजी सरपंच तातोबा कुडव, मच्छिमार नेते वसंत तांडेल, रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मयुरी शिंदे, गोवा पालये येथील निवृत्त शिक्षक प्रकाश परब, शिरोडा येथील भाजपाचे अध्यक्ष अमित गावडे, शिरोडा येथील रिक्षा युनियन चे बाबल गावडे, रेडीच्या माजी उपसरपंच नमिता नागोळकर, ग्रामपंचायत सदस्य सागर रेडकर, गणेश भगत, पोलीस पाटील कृष्णा पांडजी, अमित मडये, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, सागर राणे यासह प्रितेश राऊळ मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी रक्तदात्याना प्रमाणपत्र व टी शर्ट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
        सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपतपेढीचे डॉ. विनायक पारवे, रक्तपेढी टेक्नीशियन प्राजक्ता रेडकर, अधिपरीचारीका मानसी बागेवाडी, रक्तपेढी परीचर अनिल खाडे, तसेच कर्मचारी समीर बेग हे उपस्थित होते. हे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रितेश राऊळ मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यानी परीश्रम घेतले.