झाराप येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई.....दोन जण ताब्यात

झाराप येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई.....दोन जण ताब्यात

 

कुडाळ
 

        मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे राज्य उत्पादन शुल्क कुडाळ शाखेच्या पथकाने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी वॅगनार कार पकडली. यात 94 हजार 560 रु. किमतीची गोवा बनावटीची दारू व 1 लाख 25 हजार रु.किमतीची वॅगनार कार मिळून एकूण 2 लाख 19 हजार 560 रु. चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क कुडाळ शाखेचे दुय्यम निरीक्षक उदय थोरात यांना मुंबई-गोवा महामार्गावरून एका कार मधून गोवा बनावटीची दारू वाहतूक केली जात आहे,अशी खात्रीशीर व गोपनीय माहिती मिळाली.त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने खासगी वाहनाने महामार्गावर झाराप येथे सापळा रचला. या दरम्यान महामार्गावरून येत असलेली वॅगनार कार थांबविली आणि त्या कारची तपासणी केली असता सदर कारमध्ये गोवा बनावटी दारुचे एकूण १२ खोके आढळले. या खोक्यातील 94 हजार 560 रु.ची गोवा बनावटीची दारू जप्त केली गेली तसेच 1 लाख 25 हजार रूपायांची कारदेखील जप्त करण्यात आली. कारचालक तुषार रमेश मोरजकर(३२ रा.पिंगुळी)व त्याचा साथीदार अविनाश प्रकाश लोके (४४,रा. बिबवणे ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
         ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मागदर्शनाखाली निरीक्षक मिलींद गरुड व दुय्यम निरीक्षक उदय थोरात यांनी केली. त्यांना सदर कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक सौ.अर्चना वंजारी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरज चौधरी, जवान वैभव कोळेकर, प्रसाद खटाटे, नंदकुमार राणे, जवान व वाहनचालक संदिप कदम, मदतनीस अवधूत सावंत, विजय राऊळ व प्रशांत परब यांनी मदत केली.पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री.थोरात करीत आहेत.