फोंडाघाट महाविद्यालयाच्या सारिका येंडे हिचे सुवर्णयश!
फोंडाघाट
मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक फोंडाघाट - मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धा डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत फोंडाघाट महाविद्यालयातील कु. सारिका गुरुनाथ येंडे हिने थाळीफेक या क्रीडा प्रकारात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.सदर स्पर्धेत सारिकाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट प्रदर्शन करत इतर स्पर्धकांवर वर्चस्व राखले. तिने अंतिम फेरीत अप्रतिम फेकीद्वारे सुवर्णपदक आपल्या नावे केले. तिच्या या यशामागे तिचा क्रीडाप्रेम, मेहनत, आणि क्रीडा विभागाचे योग्य मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. महेश सावंत, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार विठोबा तायशेटे, संचालक मंडळ व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीवर्ग व फोंडाघाट ग्रामस्थांनी सारिका हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. नारे म्हणाले की, सारिकाचे हे यश केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे.फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. महेश सावंत म्हणाले की, "सारिकाने सतत परिश्रम घेऊन आपली कामगिरी उंचावली आहे. तिच्या यशामुळे महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक आणखी वाढला आहे." महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी सारिकाचे अभिनंदन केले असून, पुढील स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

konkansamwad 
