मोती तलावातील आत्महत्येचे प्रकरण : रिक्षाचालकाचा मृतदेह १७ तासांनंतर सापडला!

मोती तलावातील आत्महत्येचे प्रकरण : रिक्षाचालकाचा मृतदेह १७ तासांनंतर सापडला!

 

सावंतवाडी

 

      मोती तलावात उडी घेतलेल्या सालईवाडा येथील रिक्षा चालक रमेश जाधव (वय ४५) यांचा मृतदेह तब्बल १७ तासांनंतर तलावाच्या पात्रात आढळून आला. त्यांनी काल रात्री सुमारे १०.३० वाजता आत्महत्या केली होती.
शोधमोहीमेसाठी बाबल अल्मेडा बचाव टीमची मदत घेण्यात आली होती. त्यांच्या सदस्यांनी तलावाच्या पाण्यात उतरत काही मिनिटांतच मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली होती.
        दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.