शिरोडा वेळागर दुर्घटना....सहावा मृतदेह सापडला

शिरोडा
शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या लोकांच्या शोध मोहीमेत आज सकाळी बेपत्ता असलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह शोध पथकाला मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मृतदेह उभादांडा व मोचेमाड समुद्रकिनाऱ्याच्या ३ ते ४ वाव आतमध्ये आढळून आल्याचे समजते.कठीण पोहोच असलेल्या भागांमध्ये शोध घेण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनाने सुरू ठेवला होता या ड्रोनमध्ये सहावा मृतदेह आढळून आला. उर्वरित एक मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.