परुळे बाजार ग्रामपंचायतीच्या स्वच्छता उपक्रमांचे सुकळवाड टीमकडून कौतुक
परुळे
सुकळवाड पंचायत समिती मतदारसंघातील माजी सभापती, उपसभापती, सरपंच यांच्या टीमने परुळे बाजार ग्रामपंचायतीला भेट देऊन स्वच्छता विषयक विविध उपक्रमांची माहिती घेतली.
यावेळी माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती प्रसाद मोरजकर, प्रकाश पावसकर, सुकळवाडचे उपसरपंच किशोर पेडणेकर, स्वप्निल गावडे, अरुण पाताडे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रणिती आंबडपालकर, सदस्य सुनाद राऊळ, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी ग्रामपंचायतीत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेची तसेच विविध नवकल्पनांची माहिती दिली.
टीमने यावेळी काथ्या युनिट, तालुका प्लास्टिक संकलन युनिट, तसेच सा पाणी प्रकल्प (वॉटर एटीएम) या उपक्रमांची पाहणी केली. स्वच्छता आणि पर्यावरणपूरक कार्यप्रणालीबद्दल सुकळवाड टीमने ग्रामपंचायतीचे कौतुक केले.

konkansamwad 
