हरकुळ बुद्रुक येथील शेकडो उबाठा कार्यकर्ते भाजपात......पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

हरकुळ बुद्रुक येथील शेकडो उबाठा कार्यकर्ते भाजपात......पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

 

कणकवली

 

        कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रूक येथील उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यांनी आज  सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ओम गणेश, कणकवली येथे भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य बाळू मोरये, उल्का घाडीगावकर, सादिका हूशेनशा पटेल, उमेश गोडे, रमेश मोडक, रमेश सावंत, सुमुक तारळेकर, नितीन तारळेकर, दिलीप सामंत, भिकाजी घाडीगांवकर आणि उदय घाडीगांवकर यांचा समावेश आहे. यावेळी गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, राजू पेडणेकर, बुलंद पटेल, बालुल पटेल, अनिल कोचरे, चंद्रकांत परब आणि सर्फराज शेख आदी उपस्थित होते.
        या प्रवेशामुळे कणकवली तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी नमूद केले.