जामसंडे टिळकनगर येथील कल्पना मेस्त्री यांचे निधन.

देवगड.
जामसंडे टिळकनगर येथील श्रीमती कल्पना लक्ष्मण मेस्त्री (८५) यांचे शनिवारी रात्री ११ वा.च्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.पार्थिवावर जामसंडे स्मशानभूमीत रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जामसंडे येथील कुलस्वामिनी फॅब्रिकेशन व ॲल्युमिनियम वर्क्सचे मालक संतोष मेस्त्री व राजू मेस्त्री यांच्या त्या मातोश्री होत.