सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी काळजी घेण्याचे हवामान विभागाचे आवाहन.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी काळजी घेण्याचे हवामान विभागाचे आवाहन.

मुंबई.

   राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. नवी मुंबई, ठाणे, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गावात पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. आज देखील या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
  पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण गोवा व विदर्भामध्ये पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकण, गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज ८ जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
    ९ तारखेला कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तर १० व ११ तारखेला कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे रायगड व रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. नाशिक पुणे व सातारा येथील घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भाच्या संपूर्ण भागात मेघगर्जना व विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.