कोकण विभाग सहायक आयुक्त डॉ. मनीषा देवगुणे यांची परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट

कोकण विभाग सहायक आयुक्त डॉ. मनीषा देवगुणे यांची परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट

 


वेंगुर्ला 

 

    कोकण विभाग सहायक आयुक्त डॉ. मनीषा देवगुणे आणि त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत परुळेबाजार येथे भेट दिली आणि भेटीदरम्यान माहिती घेत तपासणी केली. वेंगुर्ले पंचायत समितीची पंचवार्षिक तपासणी अंतर्गत ही ग्रामपंचायत भेट व तपासणी करण्यात आली. यावेळी स्वतः साहाय्यक आयुक्त डॉ मनीषा देवगुणे तसेच विस्तार अधिकारी ग्रा. प. राजु धनगर, श्री. दावर यांच्यासह आरोग्य, शाळा, अंगणवाडी, पशुवैद्यकीय विभागाचे कोकण विभागीय विस्तार अधिकारी उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यासह सर्व विभागात विस्तार अधिकारी उपस्थित होते. भेटी दरम्यान परुळे आरोग्य केंद्र, शाळा परुळे नं. ३ अंगणवाडी कर्ली येथे भेट दिली व तपासणी केली.समितीचे स्वागत सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, सदस्य प्रदीप प्रभू, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी केले. समितीकडून सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांची माहिती घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग अंगणवाडी व कर्मचारी उपस्थित होते.