गतिरोधकचा अंदाज न आल्याने बांदा येथे अपघात
बांदा
मुंबई-गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे रस्त्यावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात मोटारीने दोन वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र दुचाकी व दोन मोटारींचे नुकसान झाले. हा अपघात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.अपघातग्रस्त मोटार भरधाव वेगात पुण्याहून गोव्याच्या दिशेने जात होती. रस्त्यावर गतिरोधकाचा अंदाज न आल्याने मोटारीची समोरील दुचाकीला जोरदार धडक बसली. दुचाकी त्याच्यापुढे असलेल्या मोटारीवर जाऊन आदळली. यामध्ये दुचाकी चालकाला किरकोळ दुखापत झाली. वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

konkansamwad 
