शिवसेना उबाठा पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आढावा बैठक संपन्न.....जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी केले मार्गदर्शन

शिवसेना उबाठा पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आढावा बैठक संपन्न.....जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी केले मार्गदर्शन

 

कणकवली

 

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली विधानसभेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतची आढावा बैठक आज कणकवली विजयभवन येथे संपन्न झाली. यावेळी पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी होणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  कणकवली विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कणकवली विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणती रणनीती आखली पाहिजे याच्या सूचना देखील दिल्या.
       यावेळी श्री दुधवडकर म्हणाले, आता होणारे जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या मागे ठाम उभे राहणार. कार्यकर्त्यांनी आता जोमाने काम करून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा फडकवायला हवा.
         संदेश पारकर म्हणाले, शिवसेनेला संघर्षाचा काळ हा काय नवा नाही, या संघर्ष काळात देखील आज पदाधिकाऱ्यांची ही उपस्थिती पाहून कार्यकर्त्यांना आपली निवडणूक आता लढावायची संघी मिळणार आहे त्यामुळे त्या संधी चे रूपांतर हे विजयात मिळेल. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याच ताकदीने उतरेल व जास्तीत उमेदवार उभे करून ते विजयी होतील असा आत्मविश्वास यावेळी पारकर यांनी व्यक्त केला.
       सुशांत नाईक म्हणाले, कणकवली विधानसभा मतदार संघात आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना म्हणून लोकसेवेत कार्यरत आहे. तसेच जि. परिषद, पं. समिती व नगरपंचायत निवडणुकीत सगळे उमेदवार उभे केले जातील व कणकवली विधानसभा मतदार संघात चांगल्या प्रकारची लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देणार. आज कार्यकर्त्यांच्या मागे संघटनेने भक्कम पणे राहणे गरजेचे आहे, संघटना त्याच ताकदीने कार्यकर्त्यांच्या मागे उभी राहिल्यास जास्तीत जास्त उमेदवार हे आपल्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळेल. असा विश्वास यावेळी नाईक यांनी व्यक्त केला.
         यावेळी उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, देवगड तालुकाप्रमुख  रवींद्र जोगल, वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, सुनील तेली, दिनेश नारकर, तेजस राणे, वैभव मालंडकर, सचिन सावंत, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर, युवासेना वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित पावसकर, जितेंद्र तळेकर, आशिष मेस्त्री, यशवंत गवाणकर, सर्यकांत परब, रमाकांत मोरे, जयेश धुमाळे, सुमित राणे, गुलझार काझी, ओमकार इस्वलकर, श्रीकांत गावकर, रमेश राणे, सिद्धेश राणे, सचिन सुतार, निलेश राणे, तात्या निकम, स्वप्नील रावराणे, रोहित राणे, अनंत राणे, अतुल सदडेकर, प्रकाश भोगटे, सतीश थोटम,सुहास वाडेकर, शशांक तवडे, वैभव कांबळे, विष्णु सावंत, सुनील कुले, बाळा राऊत, महेश कोदे, सुजित जाधव, लक्ष्मण रावराणे, सुनील तिर्लोटकर, जयवंत मिठबावकर, अभिषेक कदम, सुरेश जाधव, सुधाकर साटम, गौरव सावंत, रमाकांत राणे, विठोबा गुरव, जावेद पाटणकर, सागर गोरुले, विक्रांत नाईक, मंथन पांचाळ, सचिन पवार, वैभववाडी महिला तालुका संघटक दिव्या पाचकुडे, महिला तालुका अध्यक्ष माधवी दळवी, कणकवली तालुका संघटक दिव्या साळगावकर, तालुका उपसंघटक संजना कोलते, तालुका उपशहरसंघटक रोहिणी पिळणकर, देवगड विभाग प्रमुख रेश्मा सावंत, कासार्डे विभाग प्रमुख सारिका खरात, महिला कलमठ विभागप्रमुख धनश्री मेस्त्री, कलमठ ग्रा. पं. सदस्य हेलन कांबळे आदी कणकवली विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.