तिलारी घाटात आयशर टेम्पो दरीत कोसळला

दोडामार्ग
बेळगाव ते गोवा मार्गावरील तिलारी घाटात जीवघेणा अपघात घडून आलाय. जयकर पॉईंट येथील धोकादायक वळणावर आयशर टेम्पो १०० फूट दरीत कोसळल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहे. शनिवारी दुपारी बेळगावहून तिलारीच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोच्या गाडीचे ब्रेक फेल होऊन गाडी दरीत कोसळली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस हवालदार विजय जाधव घटनास्थळी पोहचले. तिथे त्यांनी गाडीत अडकलेल्या दोघांना बाहेर काढले व स्वतःच्या वाहनाने चंदगड रुग्णालयात दाखल केले. या मार्गावर अनेकवेळा मोठ्या वाहनांचे अपघात होत असतात.