वेंगुर्ला तालुक्यात १९ लाखांची चोरी; बंद घरातून सोन्याचे दागिने लंपास
वेंगुर्ला
तालुक्यातील दाभोली मोबारवाडी येथे तब्बल १९ लाख ७२ हजार रुपयांची धाडसी चोरी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने बंद घरातून डायमंड डिझाईन असलेले ५७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.याबाबत सलोनी सुधीर लोलयेकर (वय ७२, मूळ रा. दाभोली मोबारवाडी, ता. वेंगुर्ला, सध्या रा. अंधेरी (प.), मुंबई) यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना दि. १८ जून रोजी दुपारी १२.३० वा. ते २१ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वा. या कालावधीत घडली आहे. फिर्यादी मुंबईत वास्तव्यास असल्याने घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून दागिने चोरून नेले.या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाय. एन. कांबळे अधिक तपास करीत आहेत.
konkansamwad 
