बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

वेंगुर्ला


     बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील जिमखाना विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मेजर ध्यानचंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. धनराज गोस्वामी होते.सदरील कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. धनराज गोस्वामी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धनराज गोस्वामी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अद्वितीय हॉकी कौशल्यामुळे भारताने जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली. होती यांच्या खेळातील चेंडूवरील नियंत्रण, वेगवान हालचाली आणि गोल करण्याची क्षमता विलक्षण होती. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले होते. त्यांच्या खेळाने प्रेक्षक आणि प्रतिस्पर्धी दोघेही प्रभावित होत असत.  त्यांचे जीवन आणि क्रीडाप्रेम आजच्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन केले.यावेळी मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन-०४ अंतर्गत आयोजित पुरुष व महिला शूटींग स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू  कु.चैत्राली करंगुटकर, कु.समिका गावडे, कु.अमृता रेवंडकर, कु.समिका गावडे, कु.सर्वार्थ जाधव, कु. अंकुश नाईक यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी संस्था प्रतिनिधी मा. सुरेंद्र चव्हाण,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक  प्रा. सुदाम माने, जिमखाना प्रमुख डॉ. कमलेश कांबळे स्टाफ सेक्रेटरी डाॅ. सदाशिव चुकेवाड आणि पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे,ज्यू जिमखाना चेअरमन व्ही.पी. देसाई,क्रीडा शिक्षक हेमंत गावडे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे.वाय नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन वासुदेव गावडे यांनी मानले