महसूल विभागाने उत्पन्नाचे दाखले लवकरात लवकर वितरीत करा. भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन.

महसूल विभागाने उत्पन्नाचे दाखले लवकरात लवकर वितरीत करा.  भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन.

कुडाळ.

  महसूल विभागातर्फे वितरित होणारे उत्पन्नाचे दाखले लवकरात लवकर वितरीत करावे अशी विनंती भाजपा महिला मोर्चा चिटणीस तथा कुडाळ नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांनी केली आहे.
   महाराष्ट्र शासनातर्फे महिलांसाठी चालू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, या अंतर्गत आपल्या महसूल विभागातर्फे वितरित होणारे उत्पन्नाचे दाखले लवकरात लवकर वितरीत करा. या योजनेसाठी १ जुलै ते १५ जुलै मुदत असल्याने हि मुदत कमी असल्याने, इंटरनेट सर्व्हरला प्रॉब्लेम झाल्यास उशीर होईल असे निवेदन भाजपा महिला मोर्चा तर्फे कुडाळ  तहसीलदारांना देण्यात आले. 
        यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हा चिटणीस प्राजक्ता बांदेकर आणि महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.