वेंगुर्ल्यात पर्यावरणपूरक राखी व इको-फ्रेंडली पिशवी निर्मिती स्पर्धा उत्साहात

वेंगुर्ल्यात पर्यावरणपूरक राखी व इको-फ्रेंडली पिशवी निर्मिती स्पर्धा उत्साहात

वेंगुर्ला

 

      बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रोटरऍक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक राखी निर्मिती आणि कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे अध्यक्ष महाविद्यालयातील गणित शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. एम. आर. नवत्रे होते.यावेळी डॉ. धनश्री पाटील म्हणाले की, 'बीट प्लास्टिक पॉल्युशन' या जागतिक संकल्पनेनुसार अशा लहान उपक्रमातून स्थानिक पातळीवर प्लास्टिक हटाव बद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी युवकांचा सहभाग व नवनवीन पर्याय शोधणे ही शाश्वत विकासाची गरज आहे. तर प्रा. एम. आर. नवत्रे यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवून, त्याऐवजी कापडापासून बनवलेल्या पिशव्या वापरण्याचा निश्चय सर्वांनी करावा, प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा मार्ग आहे असे मत व्यक्त केले.पर्यावरणपूरक राखी स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. शलाका विजय पालव, द्वितीय क्रमांक कु. दिप्ती तुकाराम अडारकर तर तृतीय क्रमांक कु. वैभवी सुभाष घाडीगावकर यांनी मिळविला आहे तर उत्तेजनात्मक क्रमांक कु. गायत्री सावळाराम शेट्ये यांनी मिळवला आहे. इको-फ्रेंडली शॉपिंग बॅग स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. तन्वी कृष्णा गावडे, दुसरा क्रमांक कु. गायत्री सावळाराम शेट्ये तर तृतीय क्रमांक कु. शलाका विजय पालव यांनी मिळविला तर उत्तेजनात्मक मध्ये कु. वैभवी सुभाष घाडीगावकर आणि कु. सानिका लक्ष्मण खरात या विद्यार्थिनींना मिळाला आहे. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. शिवकन्या तोडकर आणि प्रीती वाडकर यांनी केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी, संस्था प्रतिनिधी मा. सुरेंद्र चव्हाण, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. सुदाम माने, डॉ. हिरोजी परब, अध्यक्ष रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला, सिंधुदुर्ग झोन यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रोटरऍक्ट पर्यावरण प्रमुख प्रीतीश लाड, डॉ. विकास शिनगारे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कमलेश कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सावन राठोड यांनी मानले.