उद्या रेडी येथील श्री गणपतीचा ४९ वा वाढदिवस

वेंगुर्ला
रेडी येथील श्री गणपतीचा ४९ वा वाढदिवस उद्या विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात पहाटे ६ वाजता अभिषेक, सकाळी ८ वाजता सत्यविनायक महापूजा, दुपारी १२.३० वाजता आरती, दुपारी १ ते ४ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ८ वाजता स्थानिकांची भजने, रात्री ८ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन देवस्थान, रेडी-नागोळेवाडीच्या वतीने करण्यात आले आहे.