सावंतवाडी हादरली!.....मोती तलावात युवती पाठोपाठ युवकाची आत्मघातकी उडी.....युवकाचा मृतदेह बाहेर, युवतीचा शोध सुरू
सावंतवाडी
शहरातील मोती तलावात आज एक धक्कादायक घटना घडली. श्रीराम वाचन मंदिरासमोर असलेल्या मोती तलावात एका युवतीने अचानक उडी घेतली, त्यानंतर लगेचच तिच्यासोबत असलेल्या युवकानेही तलावात उडी घेतली.हा प्रकार पाहताच परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. युवकाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. तर युवतीचा शोध अद्याप सुरू असून तिचा पत्ता लागलेला नाही.प्रत्यक्षदर्शी असलेल्या अन्य एका युवतीने दिलेल्या माहितीनुसार, दोघेही नातेवाईक आहेत. सदर युवक वैभववाडीचा असून तो मुंबई येथून तिला भेटण्यासाठी सावंतवाडीत आला होता. मात्र त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून युवतीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे सावंतवाडी शहरात खळबळ उडाली आहे.
konkansamwad 
