देवगड येथे पिता-पुत्र एकाच वेळी १२वी परीक्षा उत्तीर्ण

देवगड येथे पिता-पुत्र एकाच वेळी १२वी परीक्षा उत्तीर्ण

 

देवगड

 

   देवगड येथील केळकर महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक श्री. पंढरीनाथ रामचंद्र कोयंडे यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उच्च माध्यमिक कला शाखेची इयत्ता १२वीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे, 54 वर्षांचे असतानाही त्यांनी शिक्षणाची महत्वाची गरज ओळखून ही परीक्षा पूर्ण केली.याचबरोबर त्यांचेच सुपुत्र सोहम कोयंडे यांनीही याच वर्षी इयत्ता १२वी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे वडील आणि मुलगा दोघांनी एकाच वर्षी १२वी पास होण्याचा दुर्मिळ योग जुळून आला आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण विकास मंडळ देवगडचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे